कोलकाता ः वृत्तसंस्था
कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला तो केकेआरचा चौथा खेळाडू आहे.
यापूर्वी वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टीम सेफर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आयसीसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौर्यासाठी कृष्णाची स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
प्रसिधच्या आधी न्यूझीलंड संघाचा आणि केकेआर संघाकडून खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज टीम सेफर्टला कोरोनाची लागण झाली आहे. या संक्रमणामुळे तो न्यूझीलंडला जाऊ शकला नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने
याबाबत माहिती दिली. कोरोनाची लागण झाल्यामुळे सेफर्ट अहमदाबादमध्ये आयसोलेशनमध्ये राहणार असून, त्याला चेन्नईला पाठवले जाईल. तेथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जातील.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …