Breaking News

कर्मवीरांना अभिवादन!

पनवेल : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षि पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133वी जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ असलेल्या कर्मवीरांच्या पुतळ्याला ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply