Breaking News

देशात कोरोनाचे तांडव

24 तासांत चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्यूचे अक्षरशः तांडव पहायला मिळत असून, देशात अवघ्या 24 तासांमध्ये चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद आहे, तसेच सलग चौथ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात चार लाख एक हजार 78 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर तीन लाख 18 हजार 609 रुग्ण बरे झाले आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशात पहिल्यांदाच 24 तासांमध्ये चार हजार 187 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख 38 हजार 270 इतकी झाली आहे.

180 जिल्ह्यांमध्ये सात दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही!

नवी दिल्ली ः देशात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एक सकारात्मक माहिती दिली आहे. देशात गेल्या सात दिवसांत एकूण 180 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, तर गेल्या तीन आठवड्यांची आकडेवारी पाहता देशातील 54 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसांपासून एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही. ग्रुप ऑफ मिनिस्टर्सच्या 25व्या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. वर्धन संबोधित करीत होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply