Breaking News

आघाडी सरकारने कोकणाला वार्यावर सोडलंय -प्रसाद लाड

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड यांनी आघाडी सरकारने कोकणाला वार्‍यावर सोडलंय, असे म्हणत निशाणा साधला आहे. 

भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कोकणाने आजवर शिवसेनेला काय नाही दिले? पण या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोकणाला अक्षरशः वार्‍यावर सोडले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील परिस्थिती आज चिंताजनक आहे, असे म्हणत निशाणा साधला आहे, तसेच सिंदुधुर्ग आणि रत्नगिरीतील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी, अशी विनंतीदेखील केली आहे. प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

कोकणाने आजवर शिवसेनेला काय नाही दिले? पण या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोकणाला अक्षरशः वार्‍यावर सोडले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील परिस्थिती आज चिंताजनक आहे. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 15,166 रुग्ण बाधित झाले. त्यातील 11,000 रुग्ण बरे झाले आहेत. आज सिंधुदुर्गमध्ये 3675 सक्रिय रुग्ण असून केवळ 1015 इतक्याच बेड्सची व्यवस्था आहे. आरटीपीसीआर चाचणी बाबतही हीच परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात, मात्र तरीही जिल्ह्यांत ही भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे असे लाड यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरीत सध्या 27 हजार 677 रुग्ण असून 19, 448 रुग्ण बरे झाले आहेत. गावागावातील लोक तसेच काही सेवाभावी संस्था कोकणवासीयांची सेवा करत आहेत, मात्र यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक, आमदार कुठेही दिसत नाहीत असा गंभीर आरोप देखील प्रसाद लाड यांनी केला आहे, सिंदुधुर्ग आणि रत्नगिरीतील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी. सर्व आमदार, खासदारांसह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे का असेन पण एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी, अशी विनंती प्रसाद लाड यांनी केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply