Breaking News

कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

वाढत्या कोरोना संसर्गादरम्यान शनिवारी एक दिलासादायक बातमी समोर येतेय. ’ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने कोरोनावर उपचारासाठी डीआरडीओकडून तयार करण्यात आलेल्या आणखीन एका औषधाला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे.

डीआरडीओच्या ’इस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अ‍ॅण्ड अलायन्स सायन्सेस’ तसेच हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्रित येत हे औषध तयार केलेय. या औषधाला सध्या ’2 डीजी’ असे नाव देण्यात आलेय. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद स्थित डॉ. रेड्डी लॅबला देण्यात आलीय.

हे औषध क्लिनिकल ट्रायलमध्ये यशस्वी ठरले आहे. ज्या रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात आला ते लवकरात लवकर आजारातून बरे झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. सोबतच रुग्णांची ऑक्सिजनची गरजची या औषधामुळे बर्‍याच प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले.

या औषधाचा वापर कोरोना रुग्णांवर करण्यात आल्यानंतर त्यांच्यात इतर कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कमी वेळेत परिणाम दिसून येत आहे. या रुग्णांचा कोरोना रिपोर्ट फारच कमी वेळेत ’निगेटिव्ह’ येत आहे. अर्थात ते लवकर बरे होत आहेत.

डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल 2020 मध्ये लॅबमध्ये या औषधाचा प्रयोग केला होता. करोना विषाणूचं सक्रमण रोखण्यासाठी हे औषध प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. याच आधारावर ’डीसीजीआय’ने मे 2020 मध्ये या औषधाच्या दुसर्‍या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी दिली होती.

देशभरातील रुग्णालयांत या औषधाची दुसरी ट्रायल पार पडली. ट्रायलसाठी 11 रुग्णालयांतील 110 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. मे ते ऑक्टोबर महिन्यात ही ट्रायल पार पडली.

तिसर्‍या टप्पा डिसेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंत देशातील 27 रुग्णालयांत पार पडला. यात 220 रुग्णांचा समावेश करण्यात आला. यात ज्या रुग्णांवर ’2 डीजी’ या औषधाचा वापर करण्यात आला त्यातील 42 टक्के रुग्णांची ऑक्सिजनवरच अवलंबित्व तिसर्‍या दिवशी संपुष्टात आले. ही ट्रायल महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये करण्यात आली.

’2 डीजी’ औषध कसे काम करते?

पावडरच्या स्वरुपात मिळणारे हे औषध पाण्यात मिसळून रुग्णाला दिले जाते. हे औषध संक्रमित पेशींत जमा होते. त्यामुळे विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यात त्याचा उपयोग होतो. संक्रमित पेशी शोधून काढून विषाणूला आळा घालण्यासाठी हे औषध उपयोगी ठरते. या औषधामुळे रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम कमी होऊ शकतो.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply