सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग होत असल्याचे आढळून आले असून त्याची गंभीर दखल घेत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनची घोषणा केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार 9 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येत आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद राहणार आहेत.
कल्याणमध्ये उद्यापासून लॉकडाऊन
कल्याण : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही अपेक्षित रुग्णवाढीची संख्या कमी न झाल्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. सोमवारी (दि. 10) सकाळी 10 ते 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन कालावधीत फक्त दवाखाने आणि मेडिकल सुरू राहतील. किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि अन्नपदार्थांची विक्री करण्यार्यांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे.