पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणार्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला गुरुवार (दि. 21) पासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला राज्यातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, परीक्षा 20 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
यंदा प्रथमच प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. नऊ भाषा विषयांसाठी कृतीपत्रिका; तर विज्ञान आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. राज्यात दोन हजार 957 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहेत, असे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले. या वेळी सचिव डॉ. अशोक भोसले उपस्थित होते.