Breaking News

शॉर्टसर्किटमुळे भरधाव टेम्पोला आग

वाहनचालक, क्लीनर बचावले

खोपोली ः प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव टेम्पोला आग लागल्याची घटना रविवारी (दि. 9) सकाळी 7.30च्या सुमारास घडली. आगीत टेम्पो जळून खाक झाला. आग लागल्याचे लक्षात येताच चालक बन्सीलाल यादव (उत्तर प्रदेश) आणि क्लीनर तुफानी गौड  (नेपाळ) यांनी वाहनातून उडी घेतली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातग्रस्त टेम्पो रविवारी सकाळी आडोशी गावाजवळ मुंबईहून पुण्याकडे जात असताना धावत्या टेम्पोच्या केबिनच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. वाहनाला आग लागल्याची माहिती मिळताच महामार्गावरील कर्मचार्‍यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच डेल्टा फोर्स, महामार्ग पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पोहचून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आयआरबी कंपनी आणि खोपोली नगरपलिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझविली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply