म्हसळा ः प्रतिनिधी
म्हसळा पोलीस अनधिकृत व्यावसायिक, बेकायदेशीर देशी-विदेशी व हातभट्टी दारू विक्रेत्यांविरोधात विशेष कारवाई करणार आहे. एखाद्या प्रसंगात पोलीस स्वतःच फिर्यादी होऊन संबंधित अनधिकृत व्यावसायिकावर गुन्हा नोंदविणार आहेत. त्या अनुषंगाने नुकताच म्हसळा पोलिसांनी पाभरे येथे हातभट्टी दारू विक्रेता रमेश वेटकोळी याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार रामदास सूर्यवंशी यांनी सांगितले.
याबाबत पोलीस हवालदार कमलाकर लक्कस यांनी फिर्याद दिल्याने म्हसळा पोलीस ठाण्यात मुंबई प्रो. का. क. 65 (ई) अन्वये गुन्हा रजि. नं. 29/2021ने गुन्हा दाखल केल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
या वेळी आरोपीकडे 1000 रुपयांची 10 लिटर हातभट्टीची दारू आढळली. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस नाईक स्वप्नाली पवार करीत आहेत.