Breaking News

मैदानातील विक्रेते पुन्हा बाजारपेठेत

कर्जत : प्रतिनिधी

शहरात खरेदीसाठी गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या कारणासाठी कर्जत नगर परिषदेने बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा बसणार्‍या भाजी, फळ विक्रेत्यांना पोलीस मैदानात बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आले होते. मात्र तौक्ते चक्रीवादळामुळे पडलेल्या पावसाने पोलीस मैदानामध्ये चिखल झाला. व तेथील भाजी व फळ विक्रेते पुन्हा बाजारपेठेत बसू लागल्याने खरेदीसाठी  गर्दी होऊ लागली आहे.

कर्जत तालुक्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फटका बसू लागल्याने गर्दी कमी होण्याची दृष्टीने नगर परिषद प्रशासनाने कर्जत बाजारपेठेतील फळे व भाजी विक्रेत्यांना येथील पोलीस मैदानात बसण्याची व्यवस्था करून दिली होती. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत गर्दी होत नव्हती. मात्र  तौक्ते चक्रीवादळात पाऊस पडल्याने पोलीस मैदानात काही ठिकाणी पाणी साठले तर मैदानभर चिखल झाला. त्यामुळे भाजी व फळ विक्रेत्यांनी पुन्हा आपला मोर्चा बाजारपेठेत वळवला. त्यामुळे आता बाजारपेठेत जत्रेसारखी गर्दी होत असून, प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी होते. काहीही खरेदीसाठी चारचाकी व दुचाकी वाहने अगदी दुकांनांसमोर बिनधास्तपणे उभी केली जातात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत आणि भाजी, फळ विक्रेत्यांना पुन्हा पोलीस मैदानावर हलवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply