Breaking News

शुक्रवारपासून बारावीची परीक्षा

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवार (दि. 4)पासून सुरू होत असून ती 30 मार्चपर्यंत  ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर बोर्डातर्फे देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. त्यानुसार सकाळी 10.30 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 या वेळेत परीक्षा होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी साधारण 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी पोहचणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल.
दरम्यान, परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर जाऊन आसनव्यवस्था जाणून घेतली. शिक्षण मंडळासह विद्यार्थी व पालकही परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply