Friday , September 22 2023

वाहन चोरणारी दुकल अटकेत

पनवेल : वार्ताहर – रिक्षा, मोटरसायकल यांसारखी वाहने चोरणार्‍या दोन सराईत चोरट्यांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. सुरज लक्ष्मण झावरे (19) आणि शोहेब सलीम पठाण (21) अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्यांनी पनवेल भागात केलेले तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीच्या दोन ऑटो रिक्षा व एक मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळवून आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरलेली वाहने हस्तगत करण्यात आली. आरोपींची कसून चौकशी करण्यात आली असून ते अल्पवयीन असतानादेखील त्यांच्यावर वाहनचोरीचे गुन्हे दाखल होते. वाहन चोरण्यात दोघे तरबेज असून चावीशिवाय वाहन चालू करून अवघ्या काही मिनिटांमध्ये ते वाहन चोरून नेत असल्याचे तपासात आढळून आले आहे. हे दोघेही वाहन चोरल्यानंतर ते कमी किमतीत विकायचे, अन्यथा पेट्रोल संपेपर्यंत वाहन चालवून रस्त्याच्या बाजूला सोडून द्यायचे. असे प्रकार या दोघांनी केल्याचे तपासात आढळून आले आहे.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply