Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मदतीने भाजप युवामोर्चा पुरवणार रोह्यातील कोविड रुग्णांना मोफत ऑक्सिजन सेवा

धाटाव : प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष  अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक तथा दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्याकडे कोविड रुग्णांसाठी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर रोहा तालुक्यातील गरजू कोविड रुग्णांना मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन पुरविण्यात येेणार आहे. ही सेवा चोवीस तास उपलब्ध असणार असून, गरजूंनी  अधिक माहीतीसाठी अमित घाग (9226555559) किंवा राजेश डाके (8007318000) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील रुग्णांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अमित घाग यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply