उरण : वार्ताहर
शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी थेट जनसंपर्कावर भर दिला असून, घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते ठिकठिकाणी फिरून खासदार बारणेंचे परिचयपत्रक मतदारांना देत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या कामांची माहिती देत आहेत. अशाच प्रकारे भाजप, शिवसेनेच्या वतीने मतदारांना साद घालण्यात आली. या वेळी भाजप उरण शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक राजू ठाकूर, धनंजय कडवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, महालण विभाग अध्यक्ष तथा सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश कडू, नवघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर तांडेल, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामूशेठ घरत, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील व अन्य कार्यकर्ते यांनी पत्रके वाटली.