उरण : वार्ताहर
बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.843 व माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 26) भगवान गौतमबुद्ध यांची 2565वी जयंती उरण येथील बौद्धवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली.
या वेळी बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.843चे अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष हरेश जाधव, महेंद्र साळवी, चिटणीस विजय पवार, सहचिटणीस रोशन गाडे, खजिनदार अनंत जाधव, सहखजिनदार सुरेश गायकवाड, सल्लागार विनोद कांबळे, बौधाचार्य महेंद्र साळवी, प्रमोद कांबळे, नाजी नगरसेवक चिंतामण गायकवाड, मारुती तांबे, हरिचंद्र गायकवाड, मोतीराम कांबळे, महेंद्र पेडणेकर, हर्षद कांबळे, जयेश कांबळे, जयेश कांबळे आदी उपस्थित होते.
या बौद्धवाडी येथे झालेल्या बुद्धपौणिमानिमित्तच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौधाचार्य महेंद्र साळवी, प्रमोद कांबळे यांनी केले.