ग्रामीण खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे -अॅड. महेश मोहिते
रेवदंडा : प्रतिनिधी
भाजपच्या माध्यमातून अलिबाग व मुरूडमध्ये कबड्डी, क्रिकेट आदी स्पर्धा आयोजित करून युवकांना प्रोत्साहित केले जाते, जेणेकरून येथील मातीतील, ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळावे व हे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केले. सार्तिडे येथे आयोजित भाजप चषक 2023च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
मुरूड तालुक्यातील सातिर्डे येथे मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन श्री गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत वाघोबा स्पोर्ट्स नांदगाव संघाने विजेतेपद पटकाविले. द्वितीय क्रमांक श्री गणेश सातिर्डे, तृतीय क्रमांक श्री दत्तकृपा सुरई, चतुर्थ क्रमांक जय हनुमान वळके संघाने मिळविला. मालिकावीर व अंतिम लढतीचा सामनावीर वाघोबा रोहीत डवलेकर (नांदगाव), उत्कृष्ट फलदांज गणेश पडवळ (सुरई), उत्कृष्ट गोलदांज मनीष (वळके) यांची निवड करण्यात आली.
बक्षीस वितरण समारंभास राजिपचे माजी सभापती व भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीपशेठ भोईर ऊर्फ छोटमशेठ, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष संजय पाटील, परेश किल्लेकर, स्वप्नील चव्हाण, राजेश सुतार, युवा मोर्चा सरचिटणीस नितिन आर्डे, तालुका चिटणीस आशिता भोईर, वळके ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जगदीश म्हात्रे, अहिल्या म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी व खेळाडू उपस्थित होते. विजेते संघ आणि गुणवंत खेळाडूंना रोख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.