ओशोंनी येशू ख्रिस्ताच्या एका कथेचा उल्लेख केला आहे. द्राक्षाच्या मळ्याच्या मालकाने काही मजुरांना बोलावलं. द्राक्षं तोडणं गरजेचं होतं. कारण ती पिकली होती. लवकर तोडणं गरजेचं होतं, नाहीतर सडून गेली असती. त्या मजुरांनी दुपारपर्यंत काम केलं. मालकाला वाटलं, लक्षात आलं, माणसं कमी आहेत. मालक मुकादमास म्हणाला की, जा, आणखीन मजूर घेऊन ये. मुकादमानं बाजारातून आणखी काही मजूर आणले. संध्याकाळी मालक परत आला. तो म्हणाला की, यांच्याकडूनही काम होणार नाही. तू आणखी काही मजुरांना घेऊन ये. मुकादम परत गेला, पळत गेला.
काही मजूर सकाळी आले होते, काही दुपारी आले होते, काही संध्याकाळी आले होते. रात्र जवळ येत चालली होती. तेव्हा मालकाने सर्वांना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्या वाटून टाकल्या. सकाळी आलेल्या मजुरांना जेवढं दिलं तेवढंच दुपारी आलेल्या मजुरांना दिलं. ज्यांनी काहीच केलं नव्हतं, जे येऊन फक्त उभे राहिले होते, तेव्हा सूर्य मावळला होता, त्यांनासुद्धा तेवढंच दिलं.
साहजिकच सकाळी आलेले मजूर नाराज झाले, चिडले. मालक हसू लागला. तो म्हणाला, द्भपातत्त्व जाणता का? तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला जेवढं पाहिजं होतं, ते मिळालं का नाही?, मजूर म्हणाले, “जेवढं मिळायला हवं होतं तेवढं मिळालं”. मालक म्हणाला, “मग तुम्हाला चिंता कोणती? काळजी कसली?”
‘द्भपा’ या शब्दाचा अर्थ आहे की, स्वत:च्या गरजेपेक्षा जे जास्त आहे ते वाटणं, वाटणं भाग आहे, गरजेचं आहे. दिल्याशिवाय, वाटण्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. ‘द्भपा’ या शब्दाचा अर्थ आहे गुरूजवळ आहे. इतकं आहे की ते वाटलंच पाहिजे, नाहीतर त्याचं ओझं होऊन जाईल. द्भपातत्त्वाचा अभ्यास करताना आदरणीय श्री. रामशेठ ठाकूर यांचे व्यक्तिमत्त्व नजरेसमोर येते.
1992-93मध्ये आदरणीय रामशेठ ठाकूर यांंंनी रयत शिक्षण संस्थेस 62,000 रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर आजपर्यंत देणगी देत आहेत. रयत शिक्षण संंंंंस्थेचे संंंंंस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील ए. एस. सी. महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा सप्टेंबर 2020मध्ये संपन्न झाला. याप्रसंगी आदरणीय रामशेठ ठाकूर यांनी 2 कोटी 50 लाख रुपयांची देणगी दिली.
मा. रामशेठ ठाकूर यांनी मुुंंंबई, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात अनेक माध्यमिक विद्यालये, आश्रम शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक द़ृष्ट्याा अत्यंत समृद्ध केली आहेत. मा. रामशेठ ठाकूर यांची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आहे. या संस्थेची शाळा, वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ आणि प्रोफेशनल इन्स्टट्यूट मिळून 20 शैक्षणिक संकुले आहेत. त्यात सध्या सुमारे 18 हजाराहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनी अद्ययावत शिक्षण घेत आहेत.
जैनाचार्य म्हणतात की, “मनुष्याने कडक उन्हात सावली बनून मदत करण्याचे काम करावे.” मा. रामशेठ ठाकूर नेहमी दुसर्याला सावली देण्याचे काम करतात. चंद्राची भूमिका स्वीकारून समाजाला प्रकाश देण्याचं काम ते करतात.
कोरोना व्हायरस आणि लागू झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीत गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सचिव परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले.
गरीब व गरजू व्यक्तींना दोन वेळचे अन्न पुरविण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना सुरू करण्यात आली. संंंंपूर्ण लॉकडाऊनमध्ये ही भोजन सेवा अविरतपणे सुरू राहणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापौर निधीसाठी 25 लाख रुपयांची देणगी दिली. त्यांचे सुपुत्र मा. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या स्थानिक आमदार कार्यक्रम निधीतून पनवेल महानगरपालिकेला 1 कोटी 7 लाख रुपयांचा निधी वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य पुरवठा करण्यासाठी उपलब्ध करून दिला, तसेच त्यांचे दुसरे चिरंजीव महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापौर निधीसाठी 5 लाख रुपये दिले आहेत. पनवेलमधील अत्यंत गरजू रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्यात आली. दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची आर्थिक मदत केली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मनमिळावू व मदतीला धावून जाण्याच्या स्वभावाची स्तुती महाराष्ट्रात नेहमी होत असते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, ‘माझ्याकडे मला पुरेल इतके आहे. इतकेच नव्हे तर दुसर्याला देण्याइतके जास्तही आहे. ही खरी ईश्वराची द्भपा आहे. हा माझा मोठेपणा नाही, ही ईशशक्ती आहे’. भारतीय संस्कृती असे मानते की प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचा अंश असतो. म्हणूनच कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी दान परंपरा महत्त्वाची ठरते. नि:स्वार्थ भावनेने दान द्यावे, दान देताना सर्वांत पुढे असावे हा शास्त्र संकेत आदरणीय रामशेठ ठाकूर नेहमी पाळतात. या धर्म-रूढीचे स्वागत ते नेहमी करतात. आदरणीय रामशेठ ठाकूर यांच्याविषयी बोलताना, लिहिताना एका सुविचाराची आठवण होते. तो सुविचार आहे- “ज्या व्यक्तीची वाणी मधूर आहे, ज्याचे काम परिश्रमयुक्त व प्रामाणिक आहे, ज्याचे धन दान करण्यास वापरात येते, खर्या अर्थाने त्याचेच जीवन यशस्वी असते.”
“लक्ष्मी: दानवती यस्य, सफलं तस्य जीवितं॥”
आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
-प्रा. डॉ. व्ही. एन. रणदिवे, 52 बंगलो, पनवेल. दूरध्वनी: 022-27469255