माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन
पनवेल : रामप्रहर वृत्त
खासदार शरद पवारांचे ’रयत’ साठी मोलाचे योगदान लाभले असून अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भावी जीवन समृद्ध करावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 7 ते 12 डिसेंबरपर्यंत कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचा प्रारंभ रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विभागीय वक्तृत्व स्पर्धेने झाला. विभागीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनी आपली वक्तृत्व शैली प्रभावशाली करून भावी नेतृत्व सिद्ध करावे आणि जीवनामध्ये यशस्वी व्हावे असे आवाहन पुढे बोलताना केले आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या विभागीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी ‘रयत’च्या रायगड विभागाच्या सल्लागार मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार बाळाराम पाटील, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य उद्योगपती जे. एम. म्हात्रे, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व ‘रयत’चे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, जनरल बॉडी सदस्य कामगार नेते महेंद्र घरत, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आबासाहेब कोकाटे, रायगड विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, सहायक विभागीय अधिकारी शहाजीराव फडतरे, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, कामगार नेते सुरेश पाटील, विद्यालयाच्या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्यद्यापक प्रमोद मंडले, पर्यवेक्षिका विशाखा मोहिते, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्यद्वय प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, संस्थेचे लाईफ वर्कर प्रा. अरुण घाग, प्रा. स्वप्नाली म्हात्रे, प्रणिता गोळे, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे व रायगड विभागातील सर्व जिल्ह्यांतून आलेले स्पर्धक तसेच इतर अन्य शाळांमधील स्पर्धक, त्यांचे पालक विद्यार्थी, परीक्षक आणि यजमान शाखेतील शिक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथील विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आबासाहेब कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकनेते माजी खासदार आमचे ठाकूर साहेब यांच्या दातृत्वाचे दाखले देत अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील सारख्या शाखेलादेखील साहेबांनी वीस लाख रुपयांची देणगी दिल्याचा आवर्जून उल्लेख केला.
वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन असल्यामुळे गव्हाण विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या प्रेषित लांडगे या दिव्यांग विद्यार्थ्याने शरद पवार यांच्या कार्याचा आढावा घेणारे खणखणीत भाषण केले.
या वेळी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांनी रायगड विभाग कृतज्ञता सप्ताहासाठी रायगड विभागाला रूपये पंचवीस लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल तसेच गव्हाण विद्यालयामध्ये होत असलेल्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेसाठी रुपये एक लाख 75 लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल त्यांचा यजमान शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक संस्थेच्या रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यजमान शाखेचे उपशिक्षक सागर रंधवे यांनी केले तर संस्थेचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी यांनी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper