Breaking News

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, तसेच संभाजी ब्रिगेड, आगरी समाज संघटनेचे कार्यकर्ते दिलीप माळी यांच्या दुसर्‍या स्मृतिदिनानिमित्त स्वराज्य सामाजिक संस्थेतर्फे जांभूळवाडी येथील प्राथमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना स्कुलबॅग, परीक्षा पॅड, कंपासपेटी, वह्या, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जांभूळवाडी येथील प्राथमिक शाळेत छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम स्व. दिलीप माळी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष भगवान धुळे, प्रा. विजय कोंडीलकर, भानुदास भुसारी, संतोष कोळंबे, रोहिदास लोभी, विशाल माळी, मयुरी माळी, श्रीकांत आगीवले, श्रीधर बुंधाटे, मुख्याध्यापक अजय ऐनकर यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. शाळेचे शिक्षक येरूणकर यांनी आभार मानले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply