Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून उरणमध्ये विविध कामांचा शुभारंभ

पुनाडे येथे रस्त्याचे भूमिपूजन

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील पुनाडे येथे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन रविवार (दि. 30 मे) करण्यात आले. या वेळी प्रमुख भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण पूर्व विभाग शशी पाटील, प्रदीप ठाकूर, चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर, डी. बी. गावंड, सुरज म्हात्रे, कृष्णा म्हात्रे, चेतन म्हात्रे, प्रितम म्हात्रे, कुंजवी म्हात्रे, पुनाडे गाव अध्यक्ष लवेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य  अनिकेत पाटील, युवा नेते मंगेश पाटील, बूथ अध्यक्ष संदेश पाटील आदी उपस्थित होते.

आवरे येथे स्मशानभूमी दुरुस्तीच्या कामास सुरुवात

उरण : उरणचे आमदार महेश बालदी  यांच्या आमदार निधीतून तालुक्यातील आवरे ग्रामपंचायत स्मशानभूमीची दूरूस्ती अंतर्गत कामांचे भूमिपूजन नुकतेच झाले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका  महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, तालूका सरचिटणीस सुनिल पाटील  तालूका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, तालूका पदाधिकारी कुलदीप नाईक, आरएसएस संघटक रूपेश भाई, तालूका पदाधिकारी प्रदीप ठाकूर, डि. बी. गावंड, गोवठणे कार्याध्यक्ष सूरज म्हात्रे, तालुका ओबीसी सेल सचिव प्राध्यापक प्रमोद म्हात्रे, पिरकोन गाव अध्यक्ष सूनील घरत,  महिला गाव अध्यक्ष निशा म्हात्रे, गोवठणे गाव अध्यक्ष विश्रांती म्हात्रे, प्रितम म्हात्रे, चेतन म्हात्रे, चेतन गावंड, देविदास म्हात्रे, निरुबाई यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आवरे गावचे अनेक कार्यकत उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply