Breaking News

तळोजात महिलांना सौभाग्याचे वाण

हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

तळोजा : रामप्रहर वृत्त
तळोजा फेज-1 मधील सिडको मैदानात भारतीय जनता पक्षप्रणित गौर्‍या गणपती महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन रविवारी (दि. 14) करण्यात आले होते. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांची उपस्थिती लाभली.
हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात झाला. या समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, नगरसेविका चारुशीला घरत, शीतल केणी, खारघर- तळोजा शहर मंडल उपाध्यक्ष निर्दोश केणी, भाजप महिला मोर्चा खारघर-तळोजा मंडल उपाध्यक्ष आशा बोरसे, पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्ष प्रतिभा कदम, प्रतीक्षा केणी, सुरेखा केणी, गायत्री म्हात्रे, सुहासिनी शिवणेकर, नीता माळी, प्रभा सिन्हा, वैशाली पाटील, दिनकर झेंडे यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होते.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply