Breaking News

विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन टेस्ट; सुधागडात आढळले सात कोरोना पॉझिटिव्ह

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात विनाकारण व विनामास्क फिरणार्‍यांची 63 जणांची सोमवारी (दि. 7) पाली, परळी व उन्हेरे फाट्यावर तालुका आरोग्य विभागाकडून अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये तब्बल सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली. पालीमध्ये झालेल्या कारवाईत नगरपंचायत शिपाई प्रवीण थळे, रुपेश मुसळे, पोलीस कर्मचारी प्रफुल्ल चांदोरकर, हेमंत कुथे, राजेंद्र राठोड, शंकर साळवे, होमगार्ड सचिन माडे, स्वप्निल पालकर, राहुल दिघे, रुग्णवाहिका चालक समाधान भगत, वीरसिंग कुशवाह व जयेश बावकर हे सहभागी झाले होते. तहसीलदार दिलीप रायण्णावार, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply