पनवेल ः वार्ताहर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथून प्रसिद्ध होणार्या खारघर नगरी साप्ताहिकाचे विशेष कौतुक करून संपादक गुरुनाथ पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खारघर येथून प्रसिद्ध होणार्या खारघर नगरी विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले होते. या निमित्ताने त्या अंकाची भेट संपादक गुरुनाथ पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दिली. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शांताराम पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या अंकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.