ठाणे ः प्रतिनिधी
मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना जामीन मिळाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने कोटकर यांना अटक करण्यात आली होती.
शिवसेना कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर मयुरेश कोटकर यांच्यावर अटकेची कारवाई झाली तसेच त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे जनमानसात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कोटकर यांच्या जामिनावर बुधवारी (दि. 16)
सुनावणी झाली व त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. कोटकर यांनी अनेक मालिकांत काम केले असून सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे त्यांच्या अटकेचे सोशल मीडियात पडसाद उमटले होते.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …