पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमे आयोजित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 8) कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सशक्त भारत, सदृढ भारत, सक्षम भारत या शिर्षकाखाली रयत विज्ञान भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन वैज्ञानिक तथा स्पेस सायन्स रिर्सचर प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी. जे. पाटील, सहसचिव राजेंद्र साळुंखे, माजी सचिव डॉ. गणेश ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख, जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, शैलेश म्हात्रे, सुधिर घरत, रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी एस.एस.फडतरे, रोहिदास ठाकूर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवि जोशी, युवानेते हॅप्पी सिंग, आर.पी.म्हात्रे, सर्वेश म्हात्रे, विभागीय पीआरओ बाळासाहेब कारंडे, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे व अर्चना चव्हाण, संतोष गुजर, यांच्यासह पदाधिकारी, विविध विद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेमध्ये विज्ञानाला गती देण्याचे काम रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे, त्यामुळे आपण कृतज्ञता सप्ताह साजरा करत असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हंटले. तर रयत शिक्षण संस्थेची वाटचाल ही देशभरातील विविध शिक्षण संस्थांना आवाहन देणारी आणि आदर्श प्रस्थापित करणारी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी 82 वा जन्मदिवस साजरा करण्यात येणार आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्त झाल्याचे 50 वर्षे पूर्ण होत आहेत. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फोफावण्यामध्ये त्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या पाचही विभागांच्या वतीने जन्मदिनाच्या औचित्याने ’कृतज्ञता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रायगड विभागातील संस्थेचे पदाधिकारी, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, प्राचार्य, मुख्याध्यापक, शाळांचे चेअरमन व स्कूल कमिटी जेष्ठ सदस्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या बैठकीत 6 ते 12 डिसेंबर पर्यंत रायगड विभागीय स्तरावरील ’कृतज्ञता सप्ताह’ आयोजित करण्याचे एकमताने ठरले होते. त्यानुसार रायगड विभागीय स्तरावरील ’कृतज्ञता सप्ताह’ मध्ये वक्तृत्त्वस्पर्धा, निबंधस्पर्धा, चित्रकला,/ पोस्टर्स स्पर्धा, रांगोळीस्पर्धा, क्रीडास्पर्धा, महारांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, हाफ मॅरेथॉन आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने आज भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात रायगड विभागातील विविध विद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …