Breaking News

किल्ले रायगड परिसरांत जळालेली कार, घातपताचा संशय

महाड : प्रतिनिधी

किल्ले रायगडच्या परिसरांमध्ये दाट जंगल आणि निर्जन परिसरांत बुधवारी (दि. 1) सकाळी स्थानिक ग्रामस्थांना जळत असलेली कार आढळून आल्याने सदरची घटना घातपाताची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाड तालुका पोलिसांनी  त्वरीत घटनास्थळी भेट देऊन जळत असलेल्या कारची पहाणी केली. मात्र या जळलेल्या कारचे गुढ वाढले आहे.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या बांधणीचा माळ या परिसरात निजामपूर -पाचाड या मार्गावर बुधवारी सकाळी एक टोयोटा कंपनीची पांढर्‍या रंगाची कार जळत असल्याचे दिसून आले. मध्यरात्री एक वाजल्यानंतर सदरची कार अज्ञात इसमाने जाळून टाकली असण्याची शक्यता असून, या कारची नंबर प्लेट इंजीन, आंतील भाग पुर्णपणे जळून गेला असल्याने या कारचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसासमोर आहे. अज्ञात इसमाने सदर कार जाळून दुसर्‍या वाहनाने पलायन केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी महाड तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply