Tuesday , February 7 2023

राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तजिंदरला सुवर्णपदक

पतियाळा ः वृत्तसंस्था
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर याने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली.
तजिंदरने गेल्या सोमवारी इंडियन ग्रां. प्री. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 21.94 मीटर अशी कामगिरी करून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. त्यासह त्याने ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले होते. मंगळवारी त्याने 21.10 मीटर गोळाफेक करीत सुवर्णपदक प्राप्त केले. ऑलिम्पिकसाठीचा पात्रता निकष 21.10 मीटर इतका असल्यामुळे तजिंदरने आठ दिवसांच्या अंतरात दोन वेळा ही कामगिरी साकारली.
तजिंदरने मंगळवारी पाचही प्रयत्नांत 20मीटरपेक्षा जास्त अंतरावर गोळाफेक केला. पंजाबच्या करणवीर सिंगने 19.33 मीटर अशी कामगिरी करीत रौप्यपदक मिळवले. राजस्थानच्या वनम शर्मा याने 18.33 मीटरसह कांस्यपदक पटकाविले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply