Breaking News

केंद्रीय पर्यावरण पथकाकडून साई रिसॉर्टची पाहणी

परिवहनमंत्री अनिल परब अडचणीत?

रत्नागिरी ः प्रतिनिधी
परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पर्यावरण विभागाने परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आलिशान साई रिसॉर्टची शनिवारी
(दि. 12) पाहणी केली. सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबद्दल तक्रार केली होती. हे रिसॉर्ट परब यांनी काळ्या पैशांतून बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या यांनी ईडी, सीबीआय, आयकर विभाग व महसूल मंत्रालयाकडेही याबाबतची तक्रार केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूडमध्ये एक आलिशान रिसॉर्ट आहे. शनिवारी केंद्रीय पथकाकडून या साई रिसॉर्टची पाहणी करण्यात आली. कोरोना काळात कोट्यवधी रुपये खर्चून अनिल परब यांनी समुद्रकिनारी बेकायदेशीर प्रॉपर्टी खरेदी करून साई रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी याबाबत केंद्रीय पर्यावरण विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय पथकाने या रिसॉर्टची पाहणी केली. आता केंद्रीय पथकाच्या अहवालावर परब यांच्या साई रिसॉर्टचे भवितव्य ठरणार आहे.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply