Breaking News

पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव मात्र बंदिवासात!; भाजप नेते आमदार आशिष शेलार यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थीती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी येथे केली. गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केली ती जाचक असल्याकडे लक्ष वेधीत शेलार यांनी या नियमावलीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, गणेशोत्सवावर याहीवर्षी ठाकरे सरकारने जे निर्बंध लादले आहेत ते एकतर्फी आहेत. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल गणेशोत्सव महासंघ, मुर्तीकार संघटना वारंवार सरकारशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करीत असताना सरकारने कोणालाही विश्वासात न घेता गणेशोत्सवाची नियमावली मंगळवारी जाहीर केली. कारखान्यांमध्ये मुर्ती तयार करण्याचे काम चार महिने अगोदरच सुरू होते तेव्हापासून मुर्तीकार संघटना सरकारला विचारणा करीत होते पण त्याकडे दुर्लक्ष केले. घरगुती गणेशाची मुर्ती दोन फुटाची असा निर्बंध का घालण्यात आला? मग कारखान्यात तयार झालेल्या मुर्तींचे आता काय करणार? या सगळ्यावर रोजगार म्हणून विसंबून असलेल्या कारागीर, कारखानदार यांना शासन काय मदत देणार आहे का?

मूर्तिकरांना मदतीचे पॅकेज जाहीर करा

गतवर्षीपासून हा उद्योग अडचणीत आहे. त्यांना मदत तर दिली नाहीच पण आता ऐनवेळेस निर्बंध घालून त्यांची कोंडी ठाकरे सरकारने केली आहे. असा एकतर्फी निर्णय लोकशाहीत मान्य नाही. त्यामुळे सरकारने फेरविचार करावा. जर बंधने घालण्यात येणार असतील तर मुर्तीकरांना मदतीचे पॅकेज जाहीर करावे तेही शासनाचे कर्तव्य आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply