Sunday , February 5 2023
Breaking News

पॅरालिम्पिकसाठी मरियप्पन भारताचा ध्वजवाहक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताचा उंच उडीपटू मरियप्पन थांगाव्हेलूची भारतीय पॅरालिम्पिक पथकाचा ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मरियप्पनने रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कार्याध्यक्ष आर. सत्यनारायण यांनी दिली.
दरम्यान, चेक प्रजासत्ताकने व्हिसा नाकारल्यामुळे भारतीय तिरंदाजांना जागतिक मानांकन स्पर्धा या अखेरच्या पॅरालिम्पिक पात्रता स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. चेक प्रजासत्ताकने अत्यंत उच्च जोखीम असलेल्या देशांमध्ये भारत आणि ब्राझीलचा समावेश केला आहे. त्यामुळे भारताच्या 11 सदस्यीय संघाला 3 ते 10 जुलै या कालावधीत होणार्‍या स्पर्धेला मुकावे लागले आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply