Breaking News

मुंबईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त

मुंबई : प्रतिनिधी

‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019’च्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने व नियमितपणे करण्यात येत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यात 11 मार्च ते 15 एप्रिल 2019 या कालावधीत करण्यात आलेल्या विविध स्तरीय कार्यवाही दरम्यान 142 प्रकरणी सुमारे 18 लाखांपेक्षा अधिक किमतीचा अनधिकृत

मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याच प्रकरणांमध्ये 128 व्यक्तींना अटक करण्यात आली असून अवैध मद्यासाठी वाहतूक प्रकरणी सुमारे दोन लाख 55 हजार किमतीची पाच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे अनधिकृत वा अवैध मद्यसाठ्यावर कारवाई करण्यात येते. सार्वत्रिक निवडणूकविषयक आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजेच 11 मार्च 2019 पासून मुंबई उपनगर जिल्ह्याच्या हद्दीत देखील या खात्याद्वारे वेळोवेळी धडक कारवाई करण्यात येत आहे. यानुसार 11 मार्च ते 31 मार्च 2019 या कालावधीदरम्यान विविध 93 प्रकरणी सुमारे नऊ लाख 49 हजार 775 रुपये इतक्या किमतीचा नऊ हजार 924 लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने 84 व्यक्तींना अटक करण्यात आली, तर रुपये एक लाख 95 हजार एवढ्या अंदाजित किमतीची तीन वाहने देखील जप्त्ा करण्यात आली.

1 एप्रिल 2019 ते 15 एप्रिल 2019 या कालावधीदरम्यान विविध 49 प्रकरणी सुमारे आठ लाख 53 हजार 769 रुपये इतक्या किमतीचा सहा हजार 140 लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने 44 व्यक्तींना अटक करण्यात आली, तर अंदाजे रुपये 60 हजार किमतीची 2 वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. वरीलनुसार 11 मार्च 2019 ते 15 एप्रिल 2019 या कालावधीदरम्यान विविध 142प्रकरणी सुमारे 18 लाख तीन हजार 544 रुपये इतक्या किमतीचा सुमारे 16 हजार 64 लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply