
रसायनी : रामप्रहर वृत्त
जनता विद्यामंदिर अजिवली शाळेतील इयत्ता दहावीमधील 1996मध्ये एसएससी शिक्षण घेतलेल्या मित्र परिवाराची भेट सोशल
मीडियाच्या माध्यमातून 23 वर्षांनंतर झाली. या वेळी सर्व मित्रपरिवार एकत्र आल्याने त्यांच्यात आनंदाचे
वातावरण होते.
1991 मध्ये आजिवली हायस्कूलमध्ये सहावी मध्ये प्रवेश घेतला. या वेळी सर्व नवीनच होते. गरिबीची झळ सोसत असतानाच 1996मध्ये दहावी पार केली आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. कोणाचीही गाठभेट होत नव्हती. प्रत्येक जण आपापल्या संसारात प्रपंच्यात व्यस्त होता. पण अचानक सोशल मिडीयाच्या माध्यमाने फेसबुक, व्हाँटस अँठवर आमची भेट झाली. एकमेकाना आम्ही जोडले गेलो आणि निघू लागल्या जुन्या आठवनी असे करता करता गेट टुगेदर घेण्याचे ठरवले. एका मित्राने जागेच नियोजन करुन निसर्गरम्य वातावरणात आम्ही सर्व एकत्र जमलो .आम्ही चाळिशी गाठली होतो कोनी कोणाला ओळखत न्हवत. प्रत्येक जण प्रत्येकाच्या तोंडाकडे पाहत होता .चित्रविचित्र आम्ही सगळे दिसत होतो. मग सर्वानी प्रत्येकाची ओळख करुन दिली कोणी शिक्षक ,वकील ,पत्रकार राजकिय,व्यावसाईक सर्वांच्या तोंडून परिचय होत असताना प्रत्येकाचे अश्रु अनावर झाले होते. गेट टुगेदरचा केक कापून सर्वाना भरवून आनंद घेण्यात आला .जेवण झाल्यानंतर संगीत खुर्ची ,उखाणे असे विविध कार्यक्रम घेउन बक्षिस देण्यात आली.
आणि वेळ आली ती घरी जाण्याची निरोप घेण्याची पुन्हा कधी भेटुया अस म्हणताक्षणी मन भरुन आल .मग आम्ही ठरवल की आपण सर्व 23 वर्षानी एकत्र आलो आहोत. यापुढे एकीने राहणार सर्वांचा सुखात दुखात एकत्र राहणार आणि प्रत्येकानी महिन्याला दोनशे रुपये जमा करुया की जेणेकरुन कोणावर काहीही वेळ प्रसंग आला तर त्याला मदत होइल किंवा अनाथ सामाजिक संस्थेला मदत करता येइल.
यावेळी ज्योती भोपी या मैत्रिणीने मागंल्याच प्रतिक म्हणून तुळशीच रोप देऊन सर्वाचे स्वागत केले .जुन ते सोन अस सांगत मैत्री जपून ठेवा कोन कधी कामी येइल हे सांगता येत नाही आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश घेऊन स्नेह मेळाव्याची सांगता झाली.