Breaking News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

पनवेल ः कामोठे येथे एमजीएम हॉस्पिटलजवळ वाहतूकदारांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येपासून पनवेल महानगरवासीयांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर जंक्शन इम्प्रूवमेंटचे काम एनएचएआयमार्फत करावे, अशी मागणी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. या वेळी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी उपस्थित होते. या वेळी रायगड जिल्ह्यात केंद्रीय मंत्रालयातर्फे सुरू असलेली विविध विकासकामे व त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भातही चर्चा झाली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply