आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा येथे रॅली



अलिबाग : प्रतिनिधी
पनवेल मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. त्या अंतर्गत नौपाडा येथे बुधवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रचार रॅलीस सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. पनवेलमधील नौपाडा येथे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी प्रभाग समिती क अध्यक्ष दिलीप पाटील, पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, नगरसेविका अरुणा भगत, संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, प्रदिप भगत, रवि जोशी, शशिकांत भोपी, वनिता पाटील, जयश्री धापटे, रश्मी भारतद्वाज, राकेश गोवारी, प्रभाकर गोवारी, रेवती सकपाल, सागर पाटील, राजू गायकर, बबन काळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.