Breaking News

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त आयुक्तांनी घेतला आरोग्यसेवेचा आढावा

पनवेल : प्रतिनिधी

कोविड-19ची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसर्‍या लाटेची सांशकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शनिवारी (दि. 3) झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्व संबधित विभागांना सूचना केल्या. याचबरोबर लसीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसींग, कंटेन्मेट झोन, इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्र, कोरोनाबाधित रुग्णांची अद्ययावत माहिती, बेड मॅनेजमेंट, औषध वितरण यासर्वांचा आढावा घेऊन संबधित अधिकार्‍यांना आयुक्तांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीस उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, वंदना गुळवे, धैर्यशील जाधव, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आंनद गोसावी तसेच सर्व नागरी आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकिय अधिकारी, वॉर रूम संबधित अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

कळंबोलीतील प्रस्तावित जम्बो कोविड सेंटरची पाहणी

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर कळंबोली येथील भारतीय कपास निगमच्या गोडावूनमध्ये 650 खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जात आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांबरोबर जम्बो कोविड सेंटरच्या कामाची पाहणी करून कामकाजाची माहिती घेतली. या वेळी महापालिका कार्यकरी अभियंता संजय कटेकर, सिडको अधिकारी, ठेकेदार आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply