पनवेल : रामप्रहर वृत्त
करंजाडे येथे नवलाईफ जेनेरिक्स व डॉक्टर राहूल वडके क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने तर शर्मिला एस. यांच्यातर्फे रविवारी (दि.13) आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
या शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, वजन, उंच अशा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा परिसरातील 200 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. त्यातील 100 जणांना काही प्रमाणात आजार आढळल्याने पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी एम. डी. मेडिसीन (अमेरिका) डॉ. राहूल वडके, फार्मासिस्ट पल्लवी पाटील, बी. एच. एम. एस, बी. ए. मानसशास्त्र डॉ. ललिता आर. सावंत, आयोजक शर्मिला एस. यांच्यासह नवलाईफ जेनेरिक्समधील स्टाफ तपासण्या करण्यासाठी उपस्थित होता. या वेळी प्रत्येक महिन्यात अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजक शर्मिला एस. यांनी सांगितले.