Breaking News

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई ः प्रतिनिधी
काँग्रेस नेते, माजी गृहराज्यमंत्री आणि माजी मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी बुधवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तर भारतीयांचे मोठे समर्थन असलेले कृपाशंकर सिंह यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
या वेळी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, सर्व ताकदीचे लोक भाजपमध्ये  प्रवेश करीत आहेत. तीन पक्षांचे सरकार म्हणजे भाजपला विस्ताराची संधी असून महाराष्ट्राच्या इतिहासातील ही मोठी संधी आहे. भाजपच्या विरुद्ध सर्व पक्ष एक झाले, तिथे भाजप विस्तारतोय अशी परिस्थिती सर्व राज्यात दिसून येते, असे म्हटले.
मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या मोठी असून त्यांच्यामध्ये कृपाशंकर सिंह लोकप्रिय आहेत. सर्वसामान्यांचा नेता अशीही त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला तगडा उत्तर भारतीय समर्थक मिळाला आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply