Breaking News

वारे, कळंब येथे 200 रोपांची लागवड

कर्जत : बातमीदार
कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील कळंब आणि वारे परिसरात 200 झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांचे संगोपन केले जाईल, असे आश्वासन आयोजक दीपक बोराडे यांनी या वेळी दिले.
 वारे येथील तृप्तेश्वर मंदिर तलाव परिसर तसेच प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर कळंब येथील मंडल अधिकारी कार्यालय परिसरात वन विभाग आणि वन कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाडे लावण्यात आली. या वेळी वनक्षेत्रपाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे, मंडल अधिकारी भगवान बुरुड, संघटनेचे नितीन शिंदे, सतीश पाटील, मुख्याध्यापक रवी काजळे, वारे शाळेचे शिक्षक, वनपाल बागल, वनरक्षक सोनवणे, कळंब पोलीस चौकीचे गर्जे, तलाठी आशिष राऊत, व्ही. बी. मिरगिने, रामदास पाटील उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply