लंडन ः वृत्तसंस्था
भारतीय वंशाच्या अमेरिकन स्थायिक समीर बॅनर्जीने विम्बल्डनच्या मुलांच्या एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले. 17 वर्षीय समीरने अंतिम फेरीत ब्रिटनच्या व्हिक्टर लिलोव्हला 7-5, 6-3 असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. त्याचे हे कारकीर्दीतील पहिलेच जेतेपद ठरले. यापूर्वी 1954मध्ये भारताच्या रामनाथन कृष्णनने विम्बल्डनमध्ये मुलांच्या एकेरीचे जेतेपद मिळवले होते.
दरम्यान, क्रोएशियाच्या निकोला मेकटिच आणि माटे पाव्हिच जोडीने विम्बल्डन टेनिस स्पर्धेमधील पुरुष दुहेरीत जेतेपद पटकावले. अग्रमानांकित मेकटिच-पाव्हिच जोडीने मार्सेल गॅ्रनोलर्स (स्पेन) आणि होरासिओ झेबालोस (अर्जेटिना) जोडीचा 6-4, 7-6 (5), 2-6, 7-5 असा पराभव केला. गोरान इव्हानसेव्हिचने पुरुष एकेरीत पटकावलेल्या जेतेपदानंतर 20 वर्षांनंतर प्रथमच क्रोएशियाला विम्बल्डन विजेतेपद मिळवता आले.
Check Also
सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर …