Breaking News

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचची बाजी

20व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा

लंडन ः वृत्तसंस्था
सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीवर वर्चस्व गाजवून कारकीर्दीतील 20व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले. जोकोव्हिचचे हे वर्षातील आणि विम्बल्डनमधीलही सलग तिसरे अजिंक्यपद ठरले.
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या 34 वर्षीय जोकोव्हिचने सातव्या मानांकित बेरेट्टिनीला 6-7 (4-7), 6-4, 6-4, 6-3 असे चार सेटमध्ये पराभूत केले. तीन तास आणि 24 मिनिटांपर्यंत लांबलेल्या या लढतीत जोकोव्हिचने पुन्हा एकदा पिछाडीवरून सरशी साधली. या जेतेपदासह जोकोव्हिचने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोघांच्या 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांची बरोबरी साधली. 25 वर्षीय बेरेट्टिनीला मात्र पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅमसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागेल.
कारकीर्दीत सहाव्यांदा विम्बल्डन जिंकणार्‍या जोकोव्हिचला यंदा ‘गोल्डन स्लॅम’ मिळवण्याची संधी आहे. जोकोव्हिचने यंदाच्या वर्षांत ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन या स्पर्धा जिंकल्या असून त्याने ऑलिम्पिक व अमेरिकन स्पर्धा जिंकल्यास इतिहास रचला जाईल.

फेडरर, नदाल यांसारख्या मातब्बर खेळाडूंच्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी साधल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. गोल्डन ग्रँडस्लॅम मिळवण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन.
-नोव्हाक जोकोव्हिच

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply