Breaking News

भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळा बदलल्या

कोलंबो ः वृत्तसंस्था
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय आणि टी -20 मालिकेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या वेळा जाहीर केल्या आहेत. ही मालिका आता 18 तारखेपासून खेळली जाणार आहे.
श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जीटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाल्याने ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी वनडे मालिकेतील सामने दुपारी 2.30 वाजता सुरू होणार होते, परंतु वेळापत्रकात बदल झाल्यानंतर हे सामने 3 वाजता सुरू होणार आहेत, तर टी-20 मालिकेतील सामने 7 ऐवजी 8 वाजल्यापासून खेळले जाणार आहेत.


वनडे मालिका

  • पहिला सामना – 18 जुलै
  • दुसरा सामना – 20 जुलै
  • तिसरा सामना – 23 जुलै
    टी-20 मालिका
  • पहिला सामना – 25 जुलै
  • दुसरा सामना – 27 जुलै
  • तिसरा सामना – 29 जुलै

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply