Breaking News

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे तीन स्मार्ट मार्ग

सध्या शेअर बाजारात म्युच्युअल फंडाच्या मार्गाने गुंतवणूक करणार्‍यांची संख्या वेगाने वाढते आहे. ती करताना थोडी स्मार्ट पद्धतीने केली तर अधिक परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे असे तीन स्मार्ट मार्ग आहेत…

स्मार्ट इनव्हेस्टरसाठी म्यच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी तीन सुपरस्टार पद्धती उपलब्ध आहेत.

1. सिस्टेमटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)- हा पहिला पहिला सुपरस्टार पर्याय आहे. गेल्या अनेक वर्षात वेगाने प्रचलित होत असलेला हा उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणजेच म्युच्युअल फंडाची एसआयपी.

सिस्टिमटिक इव्हेस्टेमेटं प्लॅन म्हणजे काय? यामध्ये तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनेच्या माध्यमातून सामान्यतः शेअर्स किंवा बाँड मार्केट (रोखे मार्केट)मध्ये एक ठराविक रक्कम नियमित गुंतवता येते. (मासिक किंवा त्रैमासिक किंवा दर आठवड्याला) एसआयपीची दोन ठळक वैशिष्ट्ये म्हणजे लॉ ऑफ अव्हरेजिंग आणि पॉवर ऑफ कम्पाऊंडिंग

लॉ ऑफ अव्हरेजिंग – दीर्घकाळापर्यंत छोट्या छोट्या रक्कम गुंतवण्याचा फायदा म्हणजे इक्विटी मार्केटमधील तुमची जोखीमीची (रिस्क) पातळी किमान राहते.  तुमच्या गुंतवणुकीचा तुम्हाला एकूणच चांगला परतावा मिळतो. हा आहे सरासरी परताव्याचा नियम.

लॉ ऑफ कम्पाऊंडिंग – तुमच्या नेहमीच्या खर्चातून दर महिन्याला एक ठराविक रक्कम बाजूला काढून गुंतवल्याने सरासरी काळानंतर त्याचे रुपांतर चक्रवाढ वाढीच्या शक्तीमुळे (कम्पाऊंड इंटरेस्ट) एका मोठ्या रकमेमध्ये होते. हे कसे होईल ते पुढील उदाहरणाने पाहू. जर तुम्ही रुपये एक हजार दहा टक्के दराने गुंतवले तर एका वर्षानंतर त्याचे रुपये अकराशे होतात. पुढील वर्षी तुम्ही रुपये अकराशेवर व्याज कमावता. फक्त एक हजारावर नव्हे. अशा पद्धतीने दरवर्षी मिळणार्‍या व्याज मूळ रकमेत जमा केले जाते आणि दोन्ही मिळून होणार्‍या रकमेवर स्वाभाविकपणे जादा व्याज मिळते.

एसआयपीचा मार्ग सहाय्यभूत कसा ठरतो?

अ. एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इनव्हेसेट्मेंट प्लॅन मुख्यतः तुमचा गुंतवणुकीचा प्रवास सोप्या हप्त्यामध्ये विभागतो. या गुंतववणूक माध्यमाचे इतरही काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

आ. या पर्यायामुळे तुमच्या गुंतवणुकीला शिस्त लागते. बाजार कसा चालला आहे हे न पाहता तुम्ही एक ठराविक रक्कम ठराविक तारखेला गुंतवत असल्याने तुमची उद्दीष्टे दीर्घकालीन असल्याने बाजाराच्या तात्पुरत्या स्थितीला तेवढे महत्त्व देण्याचे कारण नाही.

इ. एसआयपीमुळे वेळ (टाईम) तुमच्या बाजूने असते. गुंतवणूक करणे पुढे-पुढे ढकलल्याने फार महागात पडू शकते. आतापासून दहा वर्षांनी तुम्हाला तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पन्नास लाखांची गरज असल्यास जर तुम्ही दरसाल दर शेकडा पंधरा टक्के दराने गुंतवणूक केली तर ही रक्कम तुम्हाला दरमहा अठरा हजार रुपये बचत केल्यास पन्नास लाखाचे उद्दीष्ट साध्य करता येऊ शकते, पण तुम्ही जर दोन वर्षे उशीरा सुरुवात केली तर तुम्हाला दरमहा गुंतवणूक रुपये 27 हजार करावी लागेल. म्हणजेच दरमहा रुपये नऊ हजार जास्त गुंतवणूक करावी लागेल.

ई. एसआयपी या माध्यमातून गुंतवणूक केव्हाही सुरू करता येते अगदी कमीत कमी पाचशे रुपयांपासूनही गुंतवणूक करता येते.

तुम्ही दीर्घकाळासाठी ठराविक रक्कम गुंतवित असल्याने एसआयपीमध्ये गुंतवण्यासाठी तुमच्याकडे खूप मोठी रक्कम असायला पाहिजे असे नाही. तुमच्या दीर्घकालीन उद्दीष्टांसाठी – उदाहरणार्थ मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घर घेण्यासाठी, वाहन खरेदीसाठी अथवा निवृत्तीसाठी अशा अनेक उद्दीष्टांसाठी एसआयपी हा उत्तम उपाय आहे.

2. सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) हा दुसरा सुपरस्टार पर्याय आहे. याआधी उल्लेख केलेल्या एसआयपी प्रकाराचाच वेगळा पर्याय म्हणजे एसटीपी. सुरक्षित गुंतवणुकीच्या योजनेतून (लिक्विड फंड/डेट फंड) दीर्घकालीन इक्विटी फंडात दरमहा अथवा दर आठवड्याला ठराविक रक्कम ट्रान्सफर करणे. पॉवर ऑफ कम्पाऊंडिंग आणि पॉवर ऑफ अव्हरेजिंग याचा फायदा या प्रकारात घेता येतो. या प्रकारात एसआयपीपेक्षा थोडे जास्तच रिटर्न घेता येतात.

एक रकमी रक्कम उदाहरणार्थ दहा लाख आपल्याकडे असल्यास ती रक्कम लिक्विड फंडात ठेवल्यास त्यावर वार्षिक सात ते आठ टक्के व्याज कमावता येते. याच लिक्विड फंडातून दरमहा ठराविक रक्कम इक्विटी फंडात ट्रान्सफर केल्याने उदा. (दहा हजार रुपये) तर पुढच्या आठ वर्षे चार महिन्यात आपले दहा लाख रुपये इक्विटी फंडात ट्रान्सफर झालेले असतील आणि इक्विटी फंडात याच दरम्यान पंधरा टक्के दरसाल परतावा मिळाल्यास एकूण परतावा हा वीस टक्क्यांपेक्षा जास्त मिळू शकतो. 

3. सिस्टेमिटिक विथड्रॉल प्लॅन (एसडब्लूपी) हा तिसरा सुपरस्टार पर्याय आहे. या प्रकारात दीर्घकालीन काळासाठी बॅलन्सड् फंडात गुंतवणूक करून दरमहा किंवा दर तीन महिन्यांनी ठराविक रक्कम दैनंदिन खर्चासाठी घेणे व त्याचदरम्यान मूळ मुद्दलामध्येही काही वाढ घेणे शक्य होते. सध्या प्रचलित एसडब्लूपी प्रकारात सात ते आठ टक्के वार्षिक दराने मासिक व्याज देणार्‍या म्युच्युअल फंड योजना लोकप्रिय होत आहेत.

एसडब्लूपीमध्ये दरमहा गुंतवणुकीतून परताव्याच्या रुपाने मासिक उत्पन्नाची सोय करता येते. याच धर्तीवर पोस्टामध्ये एमआयएस (मंथली इन्कम स्किम) ही फार प्रचलित आहे.

-संदीप भूशेट्टी, sbhushetty@gmail.com

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply