Breaking News

पाणी प्रश्नासंदर्भात विभाग अभियंत्यांना निवेदन

पनवेल ः प्रतिनिधी

करंजाडे सेक्टर-6मध्ये कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष, करंजाडे मिरेंद्र शहारे यांनी नुकतीच सिडको पाणीपुरवठा विभाग अभियंता राहुल सरोदे यांची भेट घेतली. या वेळी करंजाडे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत राहुल सरोदे यांना विनंती करून पाणी समस्या सोडविण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. करंजाडेमधील वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या विचारात घेऊन पाणी पुरवठ्याचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या करंजाडे परिसराकरिता 10-12 एमएलडी पाणीपुरवठा होत असून येथील लोकसंख्येच्या तुलनेत तो अपुरा आहे. करंजाडे परिसरातील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी पाणी पुरवठ्याचे प्रमाण 15 एमएलडीपर्यंत वाढविण्यात यावे, अशी विनंतीही भाजप शहराध्यक्ष, करंजाडे मिरेंद्र शहारे यांनी सिडको पाणीपुरवठा विभाग अभियंता राहुल सरोदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत माहितीस्तव आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे करंजाडेमधील रस्ते, गार्डन, गटारे आदी प्रलंबित कामांबाबतही या वेळी पाठपुरावा करण्यात आला. नवे नोडल अधिकारी श्री. मुलानी यांची भेट घेऊन लवकरात लवकर रस्त्याची व इतर कामे पूर्ण करण्यासंदर्भातही या वेळी विनंती करण्यात आली.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply