
खारघर : रामप्रहर वृत्त
लॉकडाऊन काळात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघरमध्ये गरजूंना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, जेवण्याचे पॅकेट्स वाटप करण्यात आले. या सहकार्य करणार्या भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.
जीवघेणा कोविड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला लॉकडाउन चा निर्णय घ्यावा लागला; परंतु ह्या निर्णयामुळे अनेकांवर आपत्ती कोसळली. अशा वेळेस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर भाजपच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोदी भोजन कम्युनिटी किचनची संकल्पना शिवमंदिर, सेक्टर-12 येथे राबविली. 22 एप्रिल ते 2 जूनपर्यंत सतत 43 दिवस रोज सुमारे 2000 नागरिकांना दुपारचे दर्जेदार भोजनाचे वाटप करण्यात आले.
या वेळी अनेकांचे सहकार्य लाभले. ज्यांनी रोज न चुकता जीवावर उदार होऊन सेवा केली अशा कार्यकर्त्यांचा सत्कार पनवेल महानगरपालिका ‘अ’ प्रभाग समिती मा. सभापती व नगरसेवक अभिमन्यू पाटील व मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यात उपाध्यक्ष रमेश खडकर, जयेश गोगरी, अशोक पवार, साधना पवार, प्रतिक्षा कदम, नाना घरत, विजय पाटील, अनिल साबणे, काशीनाथ घरत, कमलेश मिश्रा, विजया पाटील, मनीषा भोईर, सीमा खडसे, राजू विरेकर, मंजुनाथ कॅटरर्सचे जगदीश अण्णा, कृष्णा वखरे, संजय व सर्व आचारी वर्ग यासर्वांना मानाची शाल व श्रीफळ देउन सन्मानित करण्यात आले.
याच्या व्यतिरिक्त सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. अनेक सोसायटीज,दानशूर नागरिक, शिव मंदिर देवस्थान, खारघर पोलीस, ट्रॅफिक पोलीस, पनवेल महानगरपालिका यांचेही सहकार्य लाभले.
ज्यांच्या मानसिक व आर्थिक पाठबळीमुळे हे कार्य सफल झाले ते म्हणजे दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांचे ही विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या संपूर्ण कालावधीत आमदार प्रशांत ठाकूर व्यक्तिशः लक्ष ठेवून प्रोत्साहित करीत होते. अनेकदा सभागृह नेते माननीय परेश ठाकूर यांनी भेट दिली. या सर्वांच्या सहकार्यानेच हे सत्कार्य निर्विघ्न पार पडले. शेवटच्या सांगता दिनी म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जन्मदिवसानिमित्ताने अभिमन्यूशेठ पाटील यांच्या वतीने 130 किलो लाडवाचे वाटप करण्यात आले.
सत्काराच्या वेळी ब्रिजेश पटेल, अभिमन्यू पाटील, महिला अध्यक्षा अनिता पाटील, नगरसेवक अॅड. नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता वासुदेव पाटील, दीपक शिंदे, कीर्ती नबघरे, दिलीप जाधव, बिना गोगरी, समीर कदम, वासुदेव पाटील, मोना अडवाणी, भरत कोंढालकर, लखवीर सिंग सैनी, प्रभाकर बांगर, संजय मुळीक, मुकेश गर्ग, कुणाल संघाणी, विपुल चौतालिया, विनोद ठाकूर, अंकिता वारंग, नायडू मॅडम, नितेश पाटील व सुमित सहाय्य आदी पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.