बोर्ली येथे महायुतीची प्रचार सभा; गीतेंना विजयी करण्याचे आवाहन

रेवदंडा : प्रतिनिधी
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे सर्वसामान्यांसाठी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोर्ली येथे महायुतीच्या प्रचार सभेत केले.
महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुुरूड तालुक्यातील बोर्ली येथे जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देऊन विरोधकांवर घणाघाती टिका केली. पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मोहिते, सरपंच नौशाद दळवी, उस्मानभाई रोहेकर, सुनिल नाईक, कोळी समाजाचे चेतन पाटील यांनी, महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन केले.
राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, राजिप सदस्या राजश्री मिसाळ, भाजपचे अलिबाग मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे, मुरूड तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, मुरूड तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, उदय काठे, सरपंच सुचिता पालवणकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बोर्ली परिसरातील मतदार या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.