Breaking News

कर्जतमधील मिरची विक्री चार दिवस बंद

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत व्यापारी फेडरेशन आणि किराणा व्यापारी असोसिएशनने मिरची विक्री चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पनवेल येथील काही लोक स्कूल बस (व्हॅन)मधून मिरची घेण्यासाठी शनिवारी (दि. 9) कर्जतमध्ये आले आणि कर्जतकरांची एकच घबराट झाली. काही दक्ष कर्जतकरांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात आली. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून मिरची विक्री चार दिवस बंद असणार आहे.

नवीन पनवेलमधील काही लोक एका शाळेच्या व्हॅनने कर्जतच्या महावीर पेठेत मिरची खरेदीसाठी आले होते. हे कर्जतकरांच्या निदर्शनास आले आणि ते आक्रमक झाले. पोलिसांशी संपर्क साधल्यावर ती व्हॅन पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तोवर या घटनेने कर्जतमध्ये घबराट पसरली. रेड झोन असलेल्या पनवेल विभागातून ही व्हॅन आल्याने कोरोनाला आमंत्रण ठरू शकते, अशी भीती कर्जतमध्ये निर्माण झाली आहे. कर्जत व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष मयूर जोशी आणि किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मदन परमार, उपाध्यक्ष रणजित जैन आणि सहकार्‍यांनी शनिवारी सायंकाळी तातडीची बैठक घेऊन येत्या चार दिवसांसाठी मिरचीची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांनंतर मिरची विक्री सुरू केल्यास दुकानदारांनी कर्जतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड बघूनच मिरचीची विक्री केल्यास बाहेरून येणार्‍या मिरची खरेदीदारांवर आळा बसेल, असे मत काही जागरूक नागरिकांनी या वेळी मांडले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply