Breaking News

मोदींशिवाय पर्याय नाही

माजी मंत्री रवीशेठ पाटील यांचे प्रतिपादन

पेण : प्रतिनिधी

आपल्या देशाच्या पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय अन्य पर्याय नाही. नरेंद्र मोदीच या देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री भाजप नेते रवीशेठ पाटील यांनी केले.

रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारासाठी कासू विभागात जाहीर सभा घेण्यात आल्या. त्यात रवीशेठ पाटील बोलत होते. देशातील सर्वसामान्य जनता मोदींच्या पाठींशी असून, रायगडची जनता अनंत गितेंच्या पाठीशी असल्याने गीतेंचा विजय निश्चित असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

पेणचे जे आमदार आहेत, त्यांनी या भागाचा काय विकास केला, त्यांना कधी गावात पाहिले आहे का? असे सवाल उपस्थित करुन भाजपचे जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील यांनी, अनंत गीते रायगडची शान आहेेत, त्यांनाच विजयी करा, असे आवाहन  केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, पेण तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, सुनिल नाईक, महिला संघटक कल्पना पाटील, विभाग प्रमुख हिराजी चोगले, वासुदेव म्हात्रे, जयराज तांडेल आदींसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या सभांना उपस्थित होते.

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply