Breaking News

उरणकरांचे पाणी कपातीचे संकट टळले

रानसई धरण ओसंडून वाहू लागले

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील नौदल शस्त्रागार, उरण शहर आणि काही गावांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाची भर पडून ओसांडून वाहू लागले आहे. त्यामुळे उरण वासीयांचे पाणी संकट टळले आहे.

उरण तालुक्यात दिवसेंदिवस नागरी वस्ती ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी ही जास्त वापरात येऊ लागले आहे. वाढत्या नागरी वस्तीमुळे रानसई धरणाची पाण्याची पातळी ही उन्हाळ्याच्या अखेरीस खोलवर गेली होती.या वर्षी चक्रीवादळमुळे पावसाने उशिरा हजेरी लावली. पाऊस पडून काही दिवस पावसाने आणखीन विश्रांती घेतली होती, मात्र गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रानसई धरण पूर्णतः भरले असून ओसांडून वाहू लागले आहे. धरणाची शेवटची असणारी पातळी 120 फूट असली तरी 116.5 फूटावरून ओलांडून पाणी वाहू लागले आहे.

रानसई धरण ओसंडून वाहू लागल्याने उरण शहर व काही गावांना होणार्‍या पाणी कपातीचे संकट टळले आहे, मात्र  येणार्‍या काळामध्ये उरणमध्ये वाढत्या औद्योगिकरण आणि लोकसंख्येमुळे पाण्याची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळे हा साठा उरणच्या जनतेला कमी पडणार आहे. एकतर रानसई धरणाची उंची वाढविण्याची गरज आहे किंवा उरणसाठी दुसर्‍या धरणाची निर्मिती करावी लागणार असल्याचे मत येथील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

116.5 फूट धरणाची पातळी पूर्ण भरल्यावर 10.018 एम क्यूब एवढा पाणी साठा राहतो. सोमवारी रात्री धरण पूर्ण ओव्हर फ्लो झाले आहे. तरीही पुढे पावसाची गरज भासणार आहे.

-रंजित बिरंजे, एमआयडीसी उपअभियंता, उरण

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply