Breaking News

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी नियोजन; पनवेल मनपा हद्दीतील शाळांना आज सुटी

कळंबोली : बातमीदार

ज्येष्ठ निरूपणकार श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रविवारी (दि. 16) खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शुक्रवारपासूनच श्री सदस्य पनवेलमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे शनिवारी पनवेल महापालिका क्षेत्रातील खासगी व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना गर्दीचा किंवा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्वच शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी एका पत्रान्वे जाहीर केले आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वच शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. आपल्या निरूपणाच्या बैठकीच्या माध्यमातून समाज घडवणार्‍या ज्येष्ठ निर्माण श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण सोहळा खारघर येथे भव्य दिव्य स्वरूपात रविवारी घेण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून जवळपास वीस लाख श्री सदस्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे श्री सदस्य शुक्रवारपासूनच पनवेलमध्ये आपल्या वाहनासहित दाखल होत आहेत. त्यामुळे श्री सदस्यांच्या अलोट गर्दीमुळे शालेय विद्यार्थ्यांना कोणत्याही वाहतूक किंवा गर्दीचा सामना करण्यात येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय व खाजगी शाळांना महापालिकेने सुटी जाहीर केली आहे. शनिवारी महापालिका क्षेत्रातील सर्वच आस्थापनेच्या शाळा या बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी एका पत्रांने काढले आहे. या दरम्यान, या परिसरातील शाळांतील काही वर्ग खोल्या व मैदान ही आरक्षित करण्यात आली आहेत. त्यामुळे संभाव्य गर्दीचा विद्यार्थी व पालकांना त्रास होऊ नये यासाठी शाळाच बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस सुटीचा आनंदही उपभोक्ता येणार आहे. शुक्रवारी (दि. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव, शनिवारी महापालिकेने शाळा बंद ठेवल्या आहेत तसेच नंतर रविवार असल्याने ही शाळा बंद असल्या कारणामुळे सलग तीन दिवस सुटीचा उपभोग येथील शिक्षक व विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

आजपासून खारघरमधील अंतर्गत रस्ते वाहतुकीत बदल

नवी मुंबई :  नवी मुंबईतील खारघर येथे होणार्‍या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त शनिवार (दि. 15) 2 वाजेपासून ते रविवार (दि. 16)च्या रात्री 11वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमणी स्कूल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुद्वारा चौकपर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना घेवून येणारे वाहन-बस यासाठी हा रस्ता खुला राहणार असून इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळविले आहे.

शनिवार (दि. 15) 2 वाजेपासून ते रविवार (दि. 16)च्या रात्री 11वाजेपर्यंत ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमानी स्कुल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुव्दारा चौक पर्यंतच्या रस्त्यावर नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

असा असेल पर्यायी मार्ग

ग्रामविकास भवन ने ग्रीन हेरीटेज चौक ते मुर्ती चौक, विनायक सेठ चौक मार्गे पापडीचा पाडा, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. आरएएफ तळोजा कडून पापडीचा पाडा मार्गे, विनायक सेठ चौजातील. ओवेगावातील स्थळी जातील.

‘या’ ठिकाणी वाहनांना बंदी

नवी मुंबई : खारघर येथे होणार्‍या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त शनिवार (दि. 15) 2 वाजेपासून ते सोमवार (दि. 17)च्या सकाळी 10 वाजेपर्यंत हिरानंदानी ब्रिज सिग्नलवरून युटर्न घेऊन कोपरा ब्रिज जवळील कटने डावीकडे वळून स्वर्णगंगा चौकातून पुढे सेक्टर 35 कडील नियोजित वाहनतळाकडे जाणार आहे, असे प्रभारी पोलीस अधिकारी खारघर वाहतूक शाखा यांनी कळविले आहे. शनिवारपासून ते सोमवारच्या सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई -पुणे मार्गावरील कोपरा अंडर पास वरून स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता नमुद कार्यक्रम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश बंदी असणार आहे.

पर्यायी मार्ग : पुणे- मुंबईकडुन स्वर्णगंगाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिज खालील सिग्नल युटमेवुन परत कोपरा ब्रिजकडे जावुन कोपरा ब्रिज जवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकाकडे जावुन पुढे इच्छित स्थळी जातील. ही अधिसूचना कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंग ठिकाणावरून अनुयायी यांना येवुन येणारी वाहने अथवा बस या करिता खुला राहील अशा वाहनांना लागू असणार नाही. तसेच अग्निशमन दल, पोलीस, रूग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, असे श्री. काकडे यांनी कळविले आहे.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply