Breaking News

’कोमसाप’ खोपोली शाखेचा वर्धापन दिन उत्साहात; साहित्यिकांची उपस्थिती

खोपोली : प्रतिनिधी

ज्येष्ठ कथा व कादंबरीकार र. वा. दिघे यांची 126 वी जयंती (तिथीनुसार) व कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) खोपोली शाखेचा वर्धापन दिन सोहळा रविवारी (दि. 10) शहरातील ब्राह्मण सभा सभागृहात येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. र. वा. दिघे यांचे साहित्य व त्यांची लेखनप्रेरणा नव्या पिढीत रुजण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांनी या वेळी केले.  कोमसाप खोपोली शाखेचे उपाध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी कोमसापचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या जीवनकार्यावर कवयित्री उज्ज्वलाताई दिघे यांनी विस्तृत अभिवाचन केले. के. एम. सी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा. डॉ.भाऊसाहेब नन्नवरे यांनी र.वा. दिघे यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल विशेष मार्गदर्शन केले. कोमसापचे जनसंपर्क प्रमुख प्रा. एल. बी. पाटील, उल्हासराव देशमुख, कर्जत शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. गोपाळ शेळके, पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी विविध क्षेत्रातील 30 मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यात निर्मलाताई कुंटे, डॉ. डी. के.जोशी, साहित्यमित्र दत्ताजी मसुरकर, प्रा. एल. बी. पाटील, अ‍ॅड. मीनाताई बाम, उल्हासराव देशमुख, सुखलाल चौधरी, आण्णासाहेब कोरे, डॉ. सादिका नवाब, यशवंत सपकाळ, शुभलक्ष्मी पाटणकर, डॉ. शर्वरी घुमरे, डॉ. भाऊसाहेब नन्नवरे, श्रीनिवास कुंटे, पद्माकर गायकवाड, गुरुनाथ साठीलकर, हेमंत राजोपाध्ये, आशिष कोरे, असावरी कोरे-महाजन, वामनराव दिघे, मानस जोंधळे, डॉ. शेखर जांभळे, जयमाला पाटील, जयश्री पोळ, उषा केळवाईकर, बाबू पुजारी, अविनाश मोरे, शेखर परब, श्रद्धा पाटील, अनिल कुमार रानडे आदी मान्यवरांचा समावेश आहे. कोमसाप खोपोली शाखेचे कार्याध्यक्ष नरेंद्र हर्डीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. खोपोलीच्या माजी नगरसेविका माधवी रिठे, जीनी सॅम्यूअल, खोपोली शाखेचे माजी अध्यक्ष सुधाकर चव्हाण, गझलकार डॉ. सुभाष कटकदौंड, जनार्दन सताने, विजय घोसाळकर यांच्यासह विद्यार्थी आणि  रसीक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमसाप खोपोली शाखा उपाध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये, सुधा इतराज, कोषाध्यक्ष वामनराव दिघे, नितीन भावे, सूर्यकांत सरोदे, अनिलकुमार रानडे, प्रकाश सोनावणे, मधुमिता पाटील यांनी विशेष योगदान दिले.कार्यवाह जयश्रीताई पोळ यांनी आभार मानले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply